पुणे जिल्हा: पिरंगुट येथे अवैध मद्यसाठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 38 लाखांचा माल ताब्यात

पिरंगुट – पिरंगुट (ता. मुळशी) येथून अवैधरित्या बाळगलेला विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. जवळपास पावणे 38 लाख रुपये किंमतीचा हा अवैध साठा जप्त करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व वाहतूक विरोधी मोहिम उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे, त्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिरंगुट व परिसरात दि. 26 जूनला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक मध्यरात्री गस्त घालत होते. यावेळी पिरंगुट गावच्या हद्दीत विदेशी मद्यसाठा करण्यात येऊन त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क-डी विभागाचे निरीक्षक ऋषीकेश फुलझळके यांनी आपल्या पथकासह छापा टाकला. यावेळी पथकाने 375 मिली क्षमतेच्या प्रत्येकी 24 बाटल्या असलेले 25 बॉक्‍स, 180 मिली क्षमतेच्या प्रत्येकी 48 बाटल्या असलेले 450 बॉक्‍स, असे एकूण 475 बॉक्‍स रूपये 38 लाख 76 हजार रुपयांचा मद्यसाठा, ट्रक व एका आरोपीला अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी, उपअधीक्षक सुनिल फुलपगार, प्रविण तांबे, संजय पाटील, सहाय्यक फौजदार रोहिदास मासाळकर, समीर पडवळ, विकास गोलेकर, प्रमोद खरसडे, अभिजित सिसोलेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास नवनियुक्त निरीक्षक ऋषीकेश फुलझळके करीत आहे. जर, कोठे अवैध मद्यविक्री व वाहतूक होत असल्यास नागरिकांनी 020-26127321 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)