पुणे जिल्हा: पिण्याकरिता तसेच शेतीकरिता आवर्तन सोडण्याची मागणी

कळस – कळस (ता. इंदापुर) परिसरातील गावांत मार्च अखेरीलाच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठला असून पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या भागाकरिता महत्त्वाच्या असलेल्या जीवनदायिनी असलेल्या खडकवासला धरण साखळीतील मुळा-मूठा डाव्या कालव्याला शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

इंदापूर तालुक्‍यातील कळस, अकोले, बागवाडी, बिरंगडी, पिलेवाडी, गोसाविवाडी, विठ्ठलवाडी ही गावे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मार्च महिन्यानंतर या गावांत पाणी टंचाईच्या झळा बसू लागतात. विहिरी तळ गाठतात, त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकंती ठरलेलीच असते. यावर्षीही स्थिती कायम असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.
धरणातील पाणी नदीपात्रात सोडताना ज्या भागात पाणी मुबलक प्रमाणात आहे, तेथे उपसा करण्यास बंदी करून हे पाणी दुष्काळी भागात कशा प्रकारे पोहचेल, याकरिता पाटबंधारे विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु, असो कुठलेच उपाय होत नसल्याने गेली कित्येक दशकं कळस परिसरातील पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. तालुक्‍यात पाऊस झाला काय अन्‌ नाही झाला, तरीही पाण्याची ठोस योजना नसल्याने या भागांत पाणीटंचाई कायमच असते. यावर्षीही शेतातील उभी पिके आता पाण्याअभावी सुकू लागली आहेत. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला असला तरी विहीरी व बोअरवेल यांनी मार्च महिन्यापर्यंतच तग धरला आहे. उन्हाच्या झळा वाढू लागल्याने पाणी पातळी खाली जावू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)