पुणे जिल्हा: पाणी चोरी प्रकरणी होणार कडक कारवाई

नीरा – महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभागाच्या वतीने भरारी पथकाच्या मदतीने मंगळवारी (दि. 27) कारवाई करीत अनिधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या 140 शेतकऱ्यांवर पोलीस कारवाई तर 250 हून जादा शेतकऱ्यांवर दंडात्मक करवाई केली आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने यापुढे कडक कारवाईचे धोरण राबवले जाणार असून कोणीही अनधिकृतपणे पाणी उपसा करू नये, असे अवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यानी केले आहे.

नीरा डावा कलव्याचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 49 कलम 93 कलम 97 नुसार पाणी चोरीचा गुन्हा दाखल करणे व जलसंपदा खात्याचे झालेले नुकसानीचा पंचनामा करून संबंधित व्यक्तीच्या सातबारा उतारावर नोंद करून घेण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. तरी शेतकऱ्यांनी अनधिकृत पाणीउपसा/ पाणीवापर करू नये व होणारी कायदेशीर कारवाई टाळून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे, असे अवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रवीण कोल्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)