पुणे जिल्हा: पळशीत “जय हनुमान’कडून दूधात भेसळ

सोमेश्‍वरनगर – बारामती तालुक्‍यातील पळशी येथे जय हनुमान दूध उत्पादक संस्था दुधात युरियाची भेसळ करत असल्याचे दुसऱ्यांदा उघड झाले आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या संस्थेला रंगेहात जाळ्यात पकडले आणि कारवाईसाठी शिफारस केली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, सामाजिक कार्यकर्ते माणिक काळे यांनी अन्न व औषध विभागाचे मंत्री गिरीष बापट यांच्याकडे जय हनुमान संस्था भेसळ करत असल्याची तक्रार केली होती. यावरून रविवारी (दि. 20) या संस्थेवर कारवाई करण्यात आली होती; परंतु संस्थेने पुन्हा भेसळ करण्यास सुरवात केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर अधिकाऱ्यांनी दोन-तीन दिवस संस्थेच्या वाहनांवर पाळत ठेवली. अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी एम. जी. राठोड यांनी बुधवारी (दि. 23) रात्री आठ वाजता नीरा-बारामती रस्त्यावर या संस्थेचा टेम्पो अडविला असता टेम्पोमध्ये दूधाचे कॅन तर होतेच; परंतु दोन किलो युरिया भेसळीसीठी ठेवल्याचे निदर्शनास आले. राठोड यांनी हा टेम्पो वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आणून दुधाचे नमुने घेतले आहेत. याप्रकरणी संस्थेवर कडक कारवाई केली जाणार असून हे दूध नष्ट करण्यात आले असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)