पुणे : जिल्हा परिषदेचे यंदाचे ३२० कोटींचे अंदाजपत्रक

पुणे – जिल्ह्यात विकासकामे करताना आणि योजना राबविताना आवश्‍यकतेनुसार निधी वापरता यावा, कोणताही निधी परत जावू नये, त्याचा योग्य वापर व्हावा, जास्तीत जास्त विकासकामे व्हावी, यासाठी 2018-19 च्या अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक योजनांसाठी निधीची तरतूद न करता संयुक्तीक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी पदाधिकारी आणि सदस्यांना अखर्चित निधीची वाटणारी भिती कमी होणार आहे.

जिल्हा परिषदेचे 2018-19 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 320 कोटी रूपयाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद वित्त विभागाचे सभापती व उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सर्वसाधरण सभेपुढे सादर केले. यंदाचे अंदाजपत्रक हे विकासाला गती देणारे आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती सुजाता पवार, समाजकल्याण समितीच्या सभापती सुरेखा चौरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, प्रकल्प संचालक दिनेश डोके, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थितीत होते.

सर्वसाधारण सभेने अंदाजपत्रकाला मंजुरी दिली असून, यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये बांधकाम आणि समाजकल्याण विभागाला अधिक निधी मिळाला आहे. तसेच आरोग्य, कृषी, पशु, शिक्षण असा सर्वसमावेशक हे अंदाजपत्रक आहे. अंदाजपत्रकात भरीव वाढ झाल्यामुळे सदस्यांना विकासकामांना अधिक निधी मिळणार आहे.

गेल्या वर्षी 2017-18 चे अंदाजपत्रक 168 कोटी 70 लाखांचा होता. तर, अंतिम अंदाजपत्रक 170 कोटी रूपयांचे होते. तर यंदाचे अंदाजपत्रक 320 कोटी रूपयांचे असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 150 कोटींनी वाढलेला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी 203 कोटी 50 लक्ष रूपये तर उर्वरीत रक्कम 116 कोटी 50 लक्ष मुद्रांक शुल्क आणि पंचायत समिती उपकर म्हणून ग्रामपंचायतीना वाटप करण्यात येणार आहे.

समाजातील प्रत्येक घटकासाठी जिल्हा परिषदेतर्फे काय करता येईल, याचा बारकाईने विचार करुन अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध नाविन्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला असून, यंदाचे अंदाजपत्रक तरुण आणि सर्वसामन्यांचे प्रतिनिधित्व करणारा असेल, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. 2018-19 मध्ये समाज कल्याण विभागासाठी 33 कोटी 9 लक्ष, महिला व बाल कल्याण विभागासाठी 13 कोटी 50 लक्ष आणि नळपाणी पुरवठा योजना, दुरूस्ती आणि देखभालीसाठी 1 कोटी 70 लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या विभागासाठी किती रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली हे पुढीलप्रमाणे :

सामान्य प्रशासन विभाग : (2 कोटी 88 लाख 95 हजार रूपयांची तरतूद)
युवक आणि युवतींसाठी “जॉबफेस्ट आणि उद्योजकता तसेच व्यवसाय मार्गदर्शक मेळावा – 10 लाख रूपये
पंचायत समितीमध्ये डिजीटल माहिती फलक लावणे – 30 लाख रूपये

पंचायत विभाग : (133 कोटी 78 लक्ष 60 हजार रूपयांची तरतूद)
जिल्हा परिषद अध्यक्ष पानंद/शेती रस्ते योजना – 1 कोटी 50 लाख रूपये
ग्रामीण भागातील कारागीरांसाठी उपयुक्त साहित्य पुरवठा करण्यासाठी – 90 लाख रूपये

वित्त विभाग : (3 कोटी 86 लाख रूपयांची तरतूद)

शिक्षण : ( 23 कोटी रूपयांची तरतूद)
शाळेत हातधुणे केंद्र – 50 लाख रूपये
शाळेतील ग्रंथालयासाठी – 50 लाख रूपये
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी – 20 लाख रूपये
जिल्ह्यात क्रीडा प्रबोधनी स्थापन करण्यासाठी – 2 कोटी रूपये
शाळेच्या कंपाऊड वॉल बांधणीसाठी – 1 कोटी रूपये

बांधकाम विभाग (दक्षिण आणि उत्तर) : (58 कोटी रूपयांची तरतूद)
रस्ते, पुल विशेष दुरूस्तीसाठी – 13 कोटी रूपये
बंधाऱ्यांचे ढापे बसविण्यासाठी – 50 लाख रूपये

आरोग्य : (8 कोटी 73 लाख रूपयांची तरतूद)

सार्वजनिक आरोग्य स्थापत्य विभाग (ग्रामीण पाणी पुरवठा) : (10 कोटींची तरतूद)
हातपंप किंवा सोलरपंप – 75 लाख रूपये
विंधन यंत्र खरेदी – 1 कोटी रूपये
खडकातील टाकी करण्यासाठी – 1 कोटी रूपये

 कृषी : (8 कोटी रूपयांची तरतूद)
शेतकऱ्यांना सुधारित अवजारे आणि साहित्य पुरवठा करण्यासाठी – 5 कोटी 39 लाख 90 हजार
शेती विषयक उत्पन्नात वाढ होणे, जनजागृती आणि उपाय यासाठी – 10 लाख रूपये

पशुसंवर्धन – (4 कोटी 50 लाखांची तरतूद)
स्तनदाह निर्मुलनसाठी – 40 लाख रूपये
पशुधन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी – 10 लाख रूपये

महिला व बालकल्याण विभाग : (13 कोटी 50 लाख रूपयांची तरतूद)
मुली आणि महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम – 31 लाख रूपये
महिलांचे आरोग्य शिबिर आणि अनुषंगीक कार्यक्रमासाठी – 31 लाख रूपये
महिलांना व्यवसायभीमुख वस्तु आणि जीवनावश्‍यक वस्तु पुरविण्यासाठी – 2 कोटी 50 लाख रूपये

समाज कल्याण – (33 कोटी 9 लाख रूपयांची तरतूद)
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक सहलीसाठी – 2 कोटी 25 लाख रूपये
जीवनपयोगी किंवा व्यवसायभुमिक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी – 2 कोटी 50 लाख रूपयये


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)