पुणे जिल्हा: पक्षी वाचवा’ उपक्रमाअंतर्गत “बर्ड फीडर’चे वाटप

मंचर – सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि पक्ष्यांसाठी छतावर धान्य आणि पाणी ठेवा, अशी विनंती करणारे अनेक मॅसेज व्हॉट्‌स-ऍप, फेसबुकवर दिसत आहेत; परंतु फक्त मॅसेज पाठविण्यापेक्षा प्रत्यक्ष काही कृती करून या उपक्रमात सहभाग घ्यावा, या उद्देशाने मंचर येथील मधुबन ग्रुपद्वारे शंभर बर्ड फीडर (पक्ष्यांसाठी धान्य, पाणी पात्र) वाटप करून वेगळ्या पद्‌धतीने गुढीपाडवा साजरा केला.

मंचर येथील मधुबन ग्रुपच्या वतीने “पक्षी वाचवा’ उपक्रमाअंतर्गत 100 बर्ड फीडरचे (पक्ष्यांसाठी धान्य, पाणी पात्र) मोफत वाटप करण्यातआले. याद्वारे हजारो पक्ष्यानां अन्न-पाणी उपलब्ध होणार आहे. हे बर्ड फीडर मंचर परिसरात विविध ठिकाणी घरांच्या टेरेसवर अथवा बालकनीमध्ये धान्य भरून ठेवण्यात येतील. “जगा आणि जगू द्या’ या विचारांनी प्रेरीत होऊन मंचर येथील जैन युवा ग्रुपद्वारे असाच उपक्रम गेल्या वर्षी राबविला गेला होता. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. या उपक्रमामुळे अनेकांची सकाळ चिमण्यांच्या चिव-चिवाटाने सुरू होते आणि त्यामुळे अत्यंत प्रसन्न वाटून समाधान मिळते. हाच उपक्रम या पुढे कायम ठेवण्यासाठी मधुबन ग्रुपव्दारे बर्ड फीडरचे वाटप केले असल्याचे ग्रुपच्या सदस्यांकडून सांगण्यात आले. या बर्ड फीडरचा योग्य वापर करून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना आणि इतर लहान पक्ष्यांना वाचवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन ग्रुपव्दारे करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)