पुणे जिल्हा: धीस नंबर टेम्पररी स्वीच ऑफ

जर वीज ग्राहकांनी तक्रार करुनही 48 तासात ट्रॉन्सफॉर्मर दुरुस्त केला नाही, किंवा तो दुरुस्त करण्यासाठी वीज ग्राहकांनी फोन केल्यानंतर महावितरणच्या अधिकऱ्यांनी फोन न घेतल्यास ग्राहकांच्या समस्यांकडे मुद्दामहून दुर्लक्ष केल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात संपूर्ण पुणे जिल्ह्यात ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते आंदोलन करतील. या फेसबुक लाईव्ह आंदोलनात ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांसह जनतेनेही सहभागी व्हावे. हे आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे यांनी केले आहे.

महावितरणाचे मोबाईलनंबर ग्राहकांसाठी ठरताहे निरपयोगी

पंचायत समिती गांधीगिरीने करणार आंदोलन ; वेळप्रसंगी फेसबूक लाईव्हही करणार

मंचर – महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्‍यक सेवा म्हणून गणली जाते. ग्राहकांना संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क व्हावा, म्हणून महावितरणने ग्राहकांसाठी मोबाईल नंबर दिले आहेत; परंतु अनेकदा अधिकारी किंवा कर्मचारी ग्राहकांचा फोन घेत नाही कींवा स्वीच ऑफ असल्याने ग्राहकांची कामे रेंगाळली आहेत. कार्यालयात गेल्यावर अनेकदा अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध होत नाही. फोन न घेणारे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा ग्राहक पंचायतीच्या वतीने गांधीगिरी करीत गुलाबाचे फुल देवुन सत्कार केला जाईल, किंवा संपूर्ण पुणे जिल्ह्यात फेसबुक लाईव्ह करून ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा ऊर्जा समितीचे प्रमुख नितीन मिंडे यांनी दिला.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, की शेतकऱ्यांना मुळातच आठवड्याचे सातही दिवस पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. काही दिवसांपूर्वीच पुरवठा उपलब्ध होत आहे. त्याचा उपयोग करुन घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. कारण पुणे जिल्ह्याचा बहुतांश भागात बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे रात्रीचा असलेला वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या उपयोगी नसतो. त्यातच जर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला किंवा वीज पुरवठा करणारी वीज वाहक तार तुटली, तर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळावी, म्हणून या हेतूने महावितरणने कर्मचाऱ्यांना दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिले आहे. या दुरध्वनी क्रमांकावर 24 तासात ग्राहकांनी कधीही संपर्क साधावा. त्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तर द्यावे, असे संकेत आहेत; परंतु जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आजही दोन-तीन महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त अवस्थेत आहेत. ते दुरुस्त करावेत म्हणून वीज ग्राहक महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क साधत आहेत. परंतु काही अधिकारी जाणीवपूर्वक वीज ग्राहकांचे फोन घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामध्ये रात्रीच्यावेळी आणि सुट्टीच्या दिवशी तर अजिबातच फोन घेत नाही किंवा बंद करुन ठेवत आहे, त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या दुरध्वनी वीज ग्राहकांच्या काहिच उपयोगात येत नाही. असा प्रकार विशेषतः शाखा अभियंता या पातळीवर अधिक दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)