पुणे जिल्हा: धर्मपूरी जवळ पालखी मार्गावर भिषण अपघात

भरधाव मोटारीच्या धडकेत दोन महिला ठार

नातेपूते – महाड-पंढरपूर रस्त्यावर पालखी मार्गावरील धर्मपूरी (ता.माळशिरस) येथील भोईटे वस्तीजवळ पालवे वस्ती राजूरी (ता.फलटण) येथील इंदूबाई बापूराव निकम (वय 53) व मंगल दत्तू जाधव (वय 50) या दोघी श्रीक्षेत्र गोंदवले येथे देवदर्शनासाठी धर्मपूरी एसटी स्टॅंडवर एसटीत बसण्यासाठी पायी चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी मोटारीने त्यांना जोराची धडक दिल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघाताबाबतची मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी 7:30च्या दरम्यान श्रीक्षेत्र गोंदवले येथे देवदर्शनासाठी इंदूबाई निकम व मंगल जाधव या धर्मपूरीहून एसटीने गोंदवलेला जाण्यासाठी निघाल्या असता भोईटे वस्तीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने चालक शिवाजी विठ्ठल काळे (रा.एस.एस.रूमन.364 सेक्‍टर क्र.18, कोपरखैरणे ठाणे, मुंबई. मुळ गाव आंधळी (ता. माण) याच्या चारचाकी मोटारीने (क्र. एमएच 04 ई 9839) त्यांना जोराची धडक दिली. इंदूबाई निकम यांच्या तोंडाला, डोक्‍याला मार लागून त्या जागीच ठार झाल्या तर जखमी मंगल जाधव यांना उपचारासाठी रूग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषीत केले. अपघाताची फिर्याद इंदूबाई निकम यांचा पुतण्या दादासो भानुदास निकम यांनी नातेपुते पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुधीर गोडसे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)