पुणे जिल्हा: दोन दुचाकींची धडक; दोघां चालकांचा मृत्यू

चिंबळी – आळंदी-पुणे रस्त्यावरील चऱ्होली फाट्यावर दोन दुचाकींच्या अपघातात झाला. यात दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळ्याने मागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी अकराच्या सुमारास झाला.

किरण सुरेश सावंत (वय 24, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली), कैलास रावसाहेब काळे (वय 38, रा. धावरी, जि. नांदेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी अकराच्या सुमारास किरण सावंत चोवीसावाडीकडून चऱ्होलीकडे जात होते. याचवेळी कैलास काळे आळंदीकडून चऱ्होलीकडे येत होते. त्यावेळी या दोन्ही दुचाकींची चऱ्होली फाटा येथे जोरदार धडक झाल्याने ते रस्त्यावार कोसळले. त्याचवेळी आळंदीकडून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना उडवले. टेम्पोखाली सापडल्याने किरण आणि कैलास हे दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी या अपघाताची दिघी पोलिसांना खबर दिली. दिघी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या दोघांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)