देशातील जनता महागाईमुळे त्रस्त

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे : कर्नाटकमध्ये भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही

शिरूर – देशातील जनता नोटबंदी आणि जीएसटी महागाईमुळे त्रस्त झाली असून हे सरकार केवळ बडबड करते, अशी टीका माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिरूर येथे केली. शिरूर येथे वळसंगे हॉस्पिटलच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले, देशाच्या सीमेचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आम्ही सत्तेत असताना देशाचा सीमेवर सैनिक शहीद झाल्यावर विरोधक प्रश्न विचारायचे ते आज सत्तेत आहेत. यांच्या काळात चौपट सैनिक मारले जात आहे. कर्नाटकमध्ये भाजपच्या येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि जनतादल धर्मनिरपेक्ष या पक्षाचे सरकार सत्तेत येईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी पंतप्रधान म्हणून राहिलेल्या कोणत्याही पंतप्रधानांनी राज्याच्या निवडुकामध्ये दोन पेक्षा जास्त प्रचार सभा घेतला नाहीत. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी कर्नाटकला 23 सभा घेतल्या. कर्नाटक निवडणुकीपूर्वीच जनता दल धर्मनिरपेक्षसमवेत युती का केली नाही? या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले की, निवडणुकी पूर्वी युती करण्याचा प्रयत्न केला. परंतु युती होऊ शकली नाही. देवेगौडा यांचा पक्ष सेक्‍युलर असल्याने ते भाजपबरोबर जाणार नाही, हा विश्वास होता. कर्नाटकमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असतानाही असा निकाल कसा लागला, याबाबत त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)