पुणे जिल्हा: दुचाकीवरील दोघांनी मंगळसुत्र पळविले

वाघोली – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील दोघांनी तळेरानवाडी येथील महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे मणी मंगळसूत्र, तीन हजाराची रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 19 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना केसनंद-थेऊर रस्त्यावर रात्री 11.30च्या सुमारास घडली. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर नागरीकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरीकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहणे गरजेचे आहे.

यापुर्वी याच रस्त्यावर एका व्यक्तीचा मोबाईल बाईक वरील चोरट्यांनी रात्रीच्या वेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरुन नेला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी त्याचा छडा लावून लोणीकाळभोर येथील ऋषिकेश धेंडे, आकाश नवले, विकी म्हस्के या तिघांना अटक केली आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाढत्या लुटीच्या घटनांवर आळा घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)