पुणे जिल्हा: दुकान उघडत असताना मालकाची बॅग पळविली

वरवंड – पाटस गावातील मुख्य चौकातील शिवतारा कॉम्पलेक्‍स इमारतीतील प्रशांत माणिकचंद संचेती हे त्यांचे वर्धमान मेडिकल अँड जनरल स्टोअर दुकान उघडत असताना चोरट्याने त्यांची बॅग पळविली. यामध्ये अंदाजे 75 हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. यवत पोलीसांनी सांगितले की, आज सकाळी 8:30च्या सुमारास प्रशांत संचेती हे मेडिकल स्टोअर्स उघडण्यासाठी आले होत.

मेडिकल स्टोअर्सला दोन शटर आहेत, यातील पूर्व दिशेचे शटर उघडून संचेती हे पुढील बाजुचे शटर उघडण्यासाठी आले. त्यावेळी दुकानातुन अज्ञात व्यक्तीने त्यांची बॅग पळवून नेली. या बॅगेत 47,000 रुपये रोख रक्कम व लॅपटॉप, मोबाईल होता. याबाबत प्रशांत माणिकचंद संचेती यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार संतोष मदने हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)