पुणे जिल्हा: दरीमध्ये पडलेल्या गायीला ग्रामस्थांनी सुखरूप काढले बाहेर

संग्रहित फोटो

लोणावळा – राजमाची किल्ल्याखालील दरीमध्ये पडलेल्या एका गाईला राजमाची ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करीत सुखरूप बाहेर काढले. कोणत्याही प्रकारची अद्यावत साधनसामग्री नसताना केवळ दोरीच्या सहाय्याने या गायीला दरीतून बाहेर काढणे, मोठे जिकरीचे काम होते. मात्र गावातील तरुण मुलांनी एकत्र येत या गायीला जीवदान दिले.

मागील आठवड्यात शुक्रवारी राजमाची गावातील मारुती वरे या ग्रामस्थाची गाय राजमाची किल्ल्याखालील दरीमध्ये पडली. शनिवारी नेहमीप्रमाणे त्या भागात पर्यटक तसेच ट्रेकर्स येत असल्याने आपले दुकान लावण्यासाठी गेलेल्या स्वप्निल उंबरे याला ही गाय पडलेली दिसली. खोल दरीत असल्याने या गायीला कोठेही हलता चालता येत नव्हते. त्या दिवसापासून ग्रामस्थ या गायीला वर काढण्याचा प्रयत्न करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान बुधवारी गावातील सर्व तरुणांनी एकत्रितपणे ताकत लावत गायीला दोरीच्या सहाय्याने उचलून बाहेर काढले. आधीच दरीत पडल्यामुळे घाबरलेल्या गायीला कोणतीही इजा होऊ नये, याची तरुणांनी पूर्ण काळजी घेतली. आपले सर्व कौशल्य आणि प्रयत्न पणाला लावून त्यांनी अखेर गायीला बाहेर काढले.
या बचाव मोहिमेमध्ये दीपक लोहकरे, राहुल वाघमारे, गजानन उंबरे, रूपेश राऊत, अजय वाघमारे, मारुती वरे, गणेश उंबरे, अनंता वाघमारे, सूरज वरे, शुभम उंबरे आदींनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)