पुणे जिल्हा: तेल्या, मर रोगाने डाळिंब पिकाचे नुकसान

भवानीनगरमध्यीे डाळिंब परिषदेचे आयोजन

भवानीनगर – तेल्या आणि मर रोगामुळे डाळिंब पिकाचे खूप नुकसान होत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. या रोगांवर नियंत्रण कसे होईल आणि या व्यतिरिक्तही शेतकऱ्यांना डाळिंब पिकाबाबत माहिती मिळावी यासाठी भवानीनगर येथे डाळिंब परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सदस्य भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीएआर रामचंद्र निंबाळकर यांनी दिली.

आयसीएआर राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था आणि श्रीराम फलोत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या डाळिंब परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, श्री छत्रपती मंगल कार्यालय, भवानीनगर येथे शनिवारी (दि. 19) सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. या परिषदेचे उद्‌घाटन अन्न-नागरी पुरवठा व औषध प्रशाषन संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य गिरीश बापट आणि जल संधारण मंत्री महाराष्ट्र राज्य राम शिंदे, तसेच कृषी-फलोत्पादन आणि पणनमंत्री महाराष्ट्र राज्य सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य पाशाभाई पटेल, पुणे जिल्हा अध्यक्ष भाजप बाळा भेगडे, बाळासाहेब गावडे, अमरसिंह घोलप, वासुदेव काळे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, शाम चकोर, संध्या काळे, शहाजीराव जाचक उपस्थित राहणार आहेत .

डाळिंब पिकावर लक्ष दिले असल्याने भारत सरकारने सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र सुरू केले आहे. त्याठिकाणी राष्ट्रीय डाळिंब अनुसंधान केंद्राच्या डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी या डाळिंब संशोधन केंद्राच्या माध्यमातून डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या रोगावर संशोधन केले आहे. या संशोधनाचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या डाळिंब परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

इंदापूर तालुक्‍यात 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक डाळिंब पिकाच्या बागा आहेत; परंतु डाळिंब पिकावर तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने कित्येक प्रमाणात डाळिंबाच्या बागांचे नुकसान होत असल्याने शेतकरी दरवर्षी आर्थिक अडचणीत येत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी या डाळिंब परिषदेत अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने तालुक्‍यातील तमाम शेतकरी बाधावांनी या डाळिंब परिषदेत उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)