पुणे जिल्हा: ट्रकचालकास लुटणारे 12 तासात गजाआड

शिक्रापूर – पिंपळे जगताप येथे एका ट्रकचालकाला लुटणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलिसांनी 12 तासात गजाआड केले. याबाबत ट्रकचालक शुक्रा रामकोरा लकडा (वय 37, रा. चिंबळी फाटा, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ राहणार डोबा पोस्ट दतिया, ता. बहरून, जि. रांची, राज्य-झारखंड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. लुटमारीची घटना मंगळवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रस्त्यावर पिंपळे जगताप येथे घडली होती.

याप्रकरणी अमोल सुरेश घोंगडे (वय 19, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे), सूरज ऊर्फ मोन्या संजय देंडगे (वय 19, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) आणि मयूर रोहिदास चव्हाण (वय 19, रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील आणखी एकजण फरार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडील (एमएच 14 एएम 4282) या कारही ताब्यात घेतली.

पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास शुक्रा रामकोरा लकडा हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (सीजी 04 एलएस 5615) घेऊन झारखंड येथून येत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास ट्रकचालक लकडा यांना झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने पिंपळे जगताप येथील साखरे वडेवाले यांच्या समोर असलेल्या चहाच्या हॉटेलजवळ थांबला. तेथे एका कारमधून चारजण आले. त्यांनी आम्हाला सुद्धा चहा प्यायचा आहे, असे सांगितले. चालक लकडा यांनी त्यांना देखील चहा देऊन हॉटेलवाल्यास चहाचे पैसे दिले. त्यांनतर पुन्हा ट्रकमध्ये जाताना त्यातील एकाने लकडा यांच्या पॅंटेच्या खिशामध्ये हात घालून त्यांच्या खिशातील पाकीट काढून त्यातील 4 हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तर यावेळी कारमधील एकाने ट्रकमध्ये जाऊन ट्रकच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या डब्यातील 6 हजार रुपये काढून घेतले. कारमधून आलेले सर्वजण पळून गेले. यावेळी ट्रकचालकाला अंधारामध्ये त्यांच्या कारचा क्रमांक पुसटसा दिसला. त्यांनतर ट्रकचालक शुक्रा रामकोरा लकडा याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला असता ट्रकचालकाने सांगितलेल्या वर्णनाची एक कार आणि आरोपींच्या वर्णनाचे काही युवक शिक्रापूर भागात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने आणि योगेश नागरगोजे यांना मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, विलास आंबेकर, प्रल्हाद सातपुते, अनंता बाठे, संदीप जगदाळे यांनी शिक्रापूर येथील चाकण चौक आणि पिंपळे जगताप येथे सापळा रचून तिघांना गजाआड केले. तसेच त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तर यांचा एक साथीदार फरार झाला असून शिक्रापूर पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. हे चारही आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने हे करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)