पुणे जिल्हा: टोळक्‍याकडून तरुणावर सशस्त्र हल्ला

चाकण -खुनातील आरोपींना जेलमध्ये जाऊन भेटतो व त्यांना मदत करतो अशी शंका मनात धरून सात ते आठ जणांच्या टोळक्‍याने एका तरुणावर तलवार, कुऱ्हाड, गुप्ती व कोयत्याने वार केल्याची घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास चाकणच्या कांची इंक्‍लेव या गृहप्रकल्पामध्ये घडली.

महिन्याभरापूर्वी येथील अनिकेत शिंदे याचा खून झाला होता. यातील मुख्य आरोपी ओंकार झगडे व इतरांना जेलमध्ये जाऊन भेटून या प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून, अनिकेत शिंदे याचा मित्र ओंकार बिसणारे, हर्षल शिंदे, व इतर सहा ते सात जणांनी चक्रेश्वर मंदिर रस्त्या लगत असणाऱ्या कांची इंक्‍लेव या गृहप्रकल्पच्या आवारात काल रात्री 10.30च्या सुमारास शंकर आप्पा नाईकडे (वय 28, रा. कांची इंक्‍लेव, चाकण) व अक्षदा बजरंग माने (वय माहीत नाही) यांच्यावर तलवार, कुऱ्हाड व कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी हर्षल शिंदे, ओंकार बिसणारे व इतर सात ते आठ जणांवर (नावे माहीत नाहीत) गुन्हा दाखल केला आहे. ओंकार बिसणारे हा अनिकेत शिंदे खून प्रकरणात जखमी व फिर्यादी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)