पुणे जिल्हा: टेम्पोवर दुचाकी आदळल्याने तरुणाचा मृत्यू

शेलपिंपळगाव येथील घटना

वाकी – भरधाव निघालेल्या टेम्पोने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून वेगात आलेली दुचाकी टेम्पोवर जोरात आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड ) गावच्या हद्दीत आज (गुरुवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे निसरडा झाला असल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी वर्तविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रजीत रघुनाथ साबळे (वय 21, रा. बहुळ, ता. खेड) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.तर रंगनाथ जयवंत साबळे (रा. बहुळ, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. साबळे यांच्या फिर्यादी वरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मार्केट यार्डात शेतातील भाजीपाला घेऊन भल्या पहाटे साडे चार वाजण्याच्या दरम्यान प्रजीत साबळे व त्याचे चुलते रंगनाथ साबळे हे दोघे आपल्या दोन वेगवेगळ्या दुचाक्‍यांवरून चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून शिक्रापूर बाजूकडून चाकण बाजूकडे निघाले होते. शेलपिंपळगाव गावच्या हद्दीत भरधाव जाणाऱ्या टेम्पो (एम एच 14, एजी 3247 ) रस्त्यात अचानक ब्रेक मारल्याने टेम्पोच्या पाठीमागून आलेलेल्या प्रजीत याची दुचाकी (एमएच 12, पीयू 9408) टेम्पोमध्ये अडकली. त्यामुळे झालेल्या या अपघातात प्रजीतचा जागीच मृत्यू झाला. चाकण ग्रामीण रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)