पुणे जिल्हा: चौथ्या दिवशी मिळाला बेपत्ता युवकाचा मृतदेह

वाकी हद्दीतील घटना, नदीत पोहताना झाला होता बेपत्ता

वाकी -भामा नदीवरील बंधाऱ्याजवळील भागात पोहताना बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह गुरुवारी (दि. 19) चौथ्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी (ता. खेड) गावच्या हद्दीतील राणूबाई मंदिराजवळ नदीतील पाण्यावर तरंगताना मिळून आला आहे.

-Ads-

मागील तीन दिवस एनडीआरएफच्या जवानांनी दोन पथकांच्या साह्याने रोहकल बंधाऱ्यापासून वाकी बंधाऱ्यापर्यंत त्याचा रात्रंदिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 18) सुद्धा दुपारपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेरीस बुधवारी दुपारनंतर एनडीआरएफने शोधकार्य बंद केले होते. गुरुवारी (दि. 19) या युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला आहे. भामा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला युवक प्रदीप खंडू डोके (वय 19, रा. ओतूर, ता. जुन्नर) हा रोहकल (ता. खेड ) गावच्या हद्दीतील बंधाऱ्याजवळ सोमवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बुडाला होता. बंधाऱ्याच्या एका बाजूला पोहताना पाण्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन रोहकल बंधाऱ्यावरील पाचव्या मोरीतून दुसऱ्या बाजूकडे तो फेकला गेल्यानंतर युवक बेपत्ता झाला होता. सलग तीन दिवस एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने चाकण पोलिसांनी त्याचा शोध घेतला. अखेरीस आज गुरुवारी सकाळी संबंधित युवकाचा मृतदेह वाकी हद्दीतील राणूबाई मंदिराजवळ, प्रियदर्शनी प्रशालेच्या विरुद्ध बाजूला नदीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)