पुणे जिल्हा: चहाचे दुकान अज्ञातांनी पेटवले

बारामती – इंदापुर चौकातील प्रभात कोल्ड्रींक्‍स्‌ अँड टी हाऊस दुकान अज्ञातांनी पेटवल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारील दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्हीत आज्ञात व्यक्ती कैद्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहीती अशी की, याबाबत दतात्रय वसंतराव हारके (रा. श्रावणगल्ली, बारामती) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले प्रभात टी हाऊस बुधवारी (दि. 18) बंद झाल्यानंतर अज्ञातांनी रात्री दिड वाजण्यानंतर छताद्वारे दुकानात प्रवेश करुन दुकानातील फ्रीज, घड्याळ, इलेक्‍ट्रीक वायरींग, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड करुन 40 हजार रुपयांचे नुकसान केले. दुकानात रॉकेल आणि पेट्रोलच्या बाटल्या आढळून आल्या त्यावरुन दुकान जाळून खाक करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुकानातून धुर निघू लागल्याने शेजारील काही मंडळींनी हा प्रकार हारके यांना फोनवरुन सांगितला. हारके तातडीने दुकानात पोहचले. आग विझवण्याचा प्रयत्न केला. हारके यांचे दुकान जाळण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न झाला आहे. गतवेळी दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा आठ हजारांची रक्कम लंपास करण्यात आली होती. पोलिस यंत्रणा याबाबत करवाई करीत नाही, त्यामुळे वरंवार माझे दुकान जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून होत असल्याचे हारके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)