पुणे जिल्हा: घंटागाडी चालकावर कोयत्याने हल्ला

शिरूर -शिरूर येथील हलवाई चौक येथे जुन्या वादातून नगरपरिषद कचरा उचलणाऱ्या घंटागाडी वरील चालकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज (दि. 27) सकाळी आठच्या सुमारास घडली.

गौतम बबन चव्हाण (रा. सिद्धार्थनगर, शिरूर) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत त्याचे भाचे रामा वसंत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुल कांतीलाल बोऱ्हाडे व त्याचा अल्पवयीन साथीदार (दोघेही रा. शांतीनगर, शिरूर) या दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या बाचाबाचीच्या कारणांमुळे आज सकाळी 8वाजण्याच्या सुमारास हलवाई चौक येथे फिर्यादीचे मामा गौतम चव्हाण नगरपरिषद घंटागाडीमध्ये कचरा गोळा करत असताना सरदार पेठ येथे हे दोघे मोटरसायकल वरून आले व राहुल बोऱ्हाडे याने त्याच्या जवळच्या कोयत्याने गौतम याच्या उजव्या बाजुस कानावर व गालावर वार करून गंभीर जखमी केले. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटमास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)