पुणे जिल्हा: ग्रामपंचायतींकडे 135 कोटींची थकबाकी

महावितरण बारामती मंडलातील स्थिती : वीजपुरवठा खंडीत करणार

बारामती – महावितरणच्या बारामती मंडलांतर्गत ग्रामपंचायतींकडे पथदिव्याच्या वीजबिलांची 135 कोटी थकबाकी आहे. थकबाकी न भरल्यास महावितरण वीजपुरवठा खंडित करू शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधी, 14 वा वित्त आयोग किंवा इतर निधीतून ही थकबाकी भरावी, अशा स्पष्ट सूचना शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.

ग्रामविकास विभागातर्फे 28 फेब्रुवारी 2018 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र देण्यात आले असून या पत्रात ही सूचना करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी असून ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कधीही या पथदिव्यांच्या वीजपुरवठा खंडित करू शकते, अशी शक्‍यता ग्रामविकास विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा 14 वा वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करावा, अशा स्पष्ट सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत.
बारामती परिमंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्‍यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण 2 हजार 871 जोडण्या असून त्यांच्याकडे 135 कोटी 27 लाख रुपये थकबाकी आहे. या ग्रामपंचायतींनी पथदिव्यांच्या वीजबिलापोटी असलेल्या थकबाकीचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)