पुणे जिल्हा: गावविकासासाठी सर्वांना विश्वासात घावे

कापूरहोळ -ग्रामीण भागातील गावांचा विकास साधायचा असेल तर ग्रामसेवक व सरपंच यांचे विचार एकच पाहिजेत. कारण ही विकासाची दोन चाके आहेत. गावच्या विरोधकांना विश्वासात घ्या. ग्रामसेवकाला सर्व सहकार्य करा. सर्व घटकांना एकत्रित करून विश्वासात घावे तरच गावचा विकास होइल, असे प्रतिपादन पाटोदा गावचे सरपंच व महाराष्ट्र पंचायत राज समितीचे सदस्य भास्करराव पेरे पाटील पेरे पाटील यांनी केले.

करंदी (ता. भोर) येथे पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती भोर यांच्या वतीने रविवारी (दि. 25) वेळू-भोंगवली गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक यांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन करताना पेरे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, यशदाचे वराळे, माजी सभापती मंगलदास बांदल, माजी सदस्य कुलदीप कोंडे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच भोर तालुक्‍यातील 100 टक्‍के कर वसूली झालेल्या 16 ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचा सत्कार केला. या निमिताने माजी उपसभापती अमोल पांगारे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, गटविकास अधिकारी हराळे, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, बहुतांशी सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)