पुणे जिल्हा: गावठी कट्टा, काडतुसांसह एकास अटक

नारायणगाव -पुणे-नाशिक महामार्गावरील वारुळवाडी हद्दीत मंगळवारी (दि. 27) बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा असणारे शस्र बाळगणाऱ्या दौंड तालुक्‍यातील मलठण येथील एकाला अटक केली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

खंडू चंद्रकांत राऊत (वय 30, रा. मलठण, ता. दौड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फिर्याद पोलीस शिपाई महेश दिलीप भालेकर यांनी दिली आहे. गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर हॉटेल वैष्णवी जवळ एकजण संशयितरित्या मोटार सायकलवर फिरत असल्याची माहिती हायवे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस शिपाई राजेंद्र उतळे व महेश भालेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन खंडू राऊत याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच्या जवळ असणाऱ्या बजाज पल्सर गाडीची (एमएच 42 एके 1082) तपासणी केली असता, या गाडीच्या कापडी डिक्कीत एक गावठी कट्टा, बारा भरलेले व दोन मोकळे राऊंड (काडतुसे) आढळून आले. पोलिसांना त्याला कट्टा व शस्र परवानाबाबत विचारले असता आढळून आले नाही. त्यामुळे त्यास बेकायदेशीर रित्या शस्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे, राजेश उतळे, जाधव, दुपारगुडे, पोलीस मित्र निवृत्ती काळे यांच्या पथकाने केली. या पुढील तपास पोलीस हवालदार शंकर भवारी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)