पुणे जिल्हा: गंठण चोरणाऱ्या तीन महिला जेरबंद

एसटी बसमधून चोरी करून पलायन : नागरिकांचा सतर्कतेमुळे बेड्या

लोणी काळभोर – सासरी निघालेल्या महिलेच्या पिशवीत ठेवलेले. पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरून पळून गेलेल्या तिन परप्रांतीय महिला नागरिकांच्या सतर्कतेमुळे जेरबंद झाल्या आहेत.

ज्योती राजू गाजोलोलू (वय 28), सरोज व्यंकटेश गाजोलोलू (वय 30) व लक्ष्मी राजू गाजोलोलू (वय 25, तिघी रा. अष्टापूर, नांदेड) या तिन महिलांना अटक करण्यात आली आहे. तर कुंडलिक कांबळे (वय 30, रा. रामवाडी, ता. इंदापूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेखा कांबळे या भेकराईनगर, हडपसर येथून आज (बुधवारी) बहिण पूूूजा विजय ननवरे व आपला मुलगा मोहित यांच्या समवेत रामवाडी येथे निघाल्या होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या हडपसर, गाडीतळ येथे इंदापूरकडे एसटी बस (एमएच 20 बीटी 4115) बसमध्ये पाठीमागच्या आसणावर बसल्या. त्यांनी आपली लाल रंगाची साड्या व कपडे तसेच त्यामध्ये एका डबीत 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण असलेली पिशवी होती त्यावर त्यांचा मुलगा मोहित बसला होता. एसटीमध्ये गर्दी होती. बस मार्गस्थ झालेनंतर काही वेळाने एक महिला आपल्या लहान बाळासह मोहित यांच्याशेजारी येवून बसली. त्यानंतर दोन महिला आपल्या बाळांसह तेथे येवून उभ्या राहिल्या. बस उरूळी कांचन येथे आल्यानंतर त्या तिनही महिला घाईघाईने उतरू लागल्या त्यावेळी इतर प्रवाशांनी आरडाओरडा केला त्यामुळे त्या उतरल्यानंतर पळून गेल्या. यावेळी पूूूजा यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या पिशवीची पाहणी केली असता त्यांना गंठण ठेवलेली डबी मिळाली परंतू त्यांत गंठण नव्हते. ही बाब त्यांनी वाहकांस सांगितली. एसटी पुढे गेल्यानंतर यवत पोलीस ठाण्याचे हद्दीत सागर हॉटेल येथे थांबली. यावेळी रेखा या तक्रार देण्यासाठी उरूळी कांचन दूरक्षेत्रात आल्या होत्या. यावेळी प्रवाशांना एसटी मधून उरुळी कांचन येथे उतरून पळून गेलेल्या तिन महिला तेथील हॉटेल समोर दिसल्या. त्या एका टेम्पोत बसून यवत बाजूकडे गेल्या. सागर हॉटेल मालकाने ही बाब तात्काळ यवत पोलिसांना व कासुर्डी टोलनाका येथे महिलाच्या वर्णनासह कळवली. त्यानुसार यवत पोलीस व टोलनाका कर्मचाऱ्यांनी त्यार्तीन महिलांना पकडून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)