पुणे जिल्हा: खुनी हल्ल्यातील पाच जण ताब्यात

चाकण-येथील अनिकेत शिंदे या शाळकरी मुलाच्या खूनप्रकरणी आरोपीस मदत करतो, अशी शंका घेऊन शंकर शांताराम नाईकडे (वय 28, रा. कांची सोसायटी, चक्रेश्वर रोड, चाकण) याच्यावर केलेल्या खुनी हल्ल्यातील पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागील महिन्यात अनिकेत शिंदे या सोळा वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून झाला होता. यातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील एका आरोपीस गुन्ह्यात मदत करीत असल्याची शंका आल्याने आठ ते दहा जणांनी नाईकडे वर 22 मार्चला कुऱ्हाड व कोयत्याने खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यातील पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयाने बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)