पुणे जिल्हा: खडकवासला भागात अवकाळी पाऊस

पानशेत – खडकवासलासह सिंहगड भागात गुरूवारी (दि.17) अवकाळी पाऊस झाला. पानशेत रोड, सिंहगड भागात पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ झाली. तर दुचाकीस्वारांना कसरत करत मार्ग काढावा लागत होता.

पावसामुळे पानशेतसह सिंहगड भागातही बत्ती गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ अंधारात रहावे लागले. याचबारोबर, किरवटवाडी, खानापूर, मालखेड ,वरदाडे, गोऱ्हे बुद्रुक आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. वादळ, वाऱ्यास पाऊस झाला. तसेच विजा चमकत होत्या. तर ढगांचा गडगडाट सुरूच होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)