पुणे जिल्हा: क्रेडाईच्यावतीने बांधकाम कामगार नोंदणी

बारामती – बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने बारामती क्रेडाईच्यावतीने शुक्रवारी (दि. 30) बांधकाम कामगार नोंदणीचे आयोजन क्रेडाईच्या कार्यालयात करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे अवाहन अध्यक्ष दिपक काटे यांनी केले आहे.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. खुदाई कामगार, सेंट्रींग कामगार, गवंडी, फिटींग, पेंन्टींग, फर्नीचर, सुतार, फॅब्रीकेटर्स आदी कामगारांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. बांधकाम कामगारांबरोबरच त्यांच्या पाल्यांना देखील या योजनांचा लाभ मिळाणार आहे. नोंदणी अर्ज, फोटो, बांधकाम कामगार असल्याचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बॅंक पासबुक आदी कागदपत्रांसह क्रेडाई कार्यालयात नोंदणी करण्यासाठी कामगारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)