पुणे जिल्हा: कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये तरुणाचा खून

नीरा डाव्या कालव्यात मृतदेह आढळला : गूढ उलगडले नाही

सोमेश्‍वरनगर – बारामती तालुक्‍यातील कोऱ्हाळे बुद्रुक जवळ पेशवेवस्ती येथील हनुमान मंदिरात एका मध्यमवयीन तरुणाचा व्यक्‍तीने खून केला असून त्याचा मृतदेह नीरा डावा कालव्यात मिळाला आहे.

संतोष चांगदेव कदम (वय 35 रा. कदमवस्ती यवत ता. दौंड) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. 19) मधयरात्रीला या तरुणाचा खून झाल्याची शक्‍यता असून हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात रक्‍ताचे डाग आहेत. तर खून केल्यानंतर अमानुषपणे मृताचे हातपाय दोराने बांधून एक किलोमीटर अंतरावर फलटण-शिरूर महामार्गावरील नीरा डाव्या कालव्याच्या पुलापर्यंत ओढत नेल्याचे पुरावे मिळाले आहेत. दरम्यान, हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आढळल्याने लोक भयभीत झाले होते. रक्ताचे डाग कालव्याच्या पुलापर्यंत आढळल्याने खून करून मृतदेह कालव्याच्या प्रवाहात टाकल्याची चर्चा दिवसभर गावात होती. मात्र गूढ उलगडत नव्हते.आज (मंगळवारी) मानाप्पावस्ती येथील जहागीरदार वस्ती नजीक एका शाळकरी मुलाला पाण्याच्या प्रवाहात मृतदेह तरंगताना दिसले. त्यानंतर पोलीस पाटील शरद खोमणे यांनी तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले असता त्याच्या पॅन्टच्या खिशात आधारकार्ड सापडल्याने मृतांची ओळख पटली. घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)