पुणे जिल्हा: कोरेगाव भीमा सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज वाटप

कारेगाव भीमा, दि. 24 (वार्ताहर) – येथील कोरेगाव भीमा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने 375 शेतकऱ्यांना 230 हेक्‍टर क्षेत्रावर सुमारे 2 कोटी 65 लाख रुपये पिक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रमेश दादाभाऊ गव्हाणे यांनी दिली आहे.

यावेळी गव्हाणे म्हणाले, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्यामार्फत शेतकऱ्यांना खरीब आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध पिकासाठी कर्जे देण्यात आले. हे शून्य टक्के दराने सवलत दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यावेळी चेअरमन रमेश गव्हाणे, संचालक संजय फडतरे, ज्ञानेश्वर गव्हाणे, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक योगेश शिवले, महेश मांढरे, संस्थेचे सचिव मधुकर कंद यांसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)