पुणे जिल्हा: कुंडीत लावलेल्या वडाच्या रोपाला गुंडाळला धागा

संग्रहित फोटो

वटपौर्णिमेसाठी महिला शिक्षकांचा उपक्रम :

आणे – मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील महिला शिक्षिकांनी शाळेतील कुंडीत महिन्यापूर्वी झाड लाऊन आज त्याची पूजा केली. कुंडीत लावलेले वडाचे झाड शाळेच्या कंपाऊंडमध्ये लावून त्याची देखभाल या शिक्षिका करणार आहेत. अशाप्रकारे आगळी वेगळी वटपौर्णिमा साजरी केल्याने शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी या महिला शिक्षिकेचे कौतुक केले. ज्या महिला कार्यालयात काम करतात त्याही वडाची पूजा करणं टाळत नाहीत. कुठेही असो सुवासिनी वडाची पूजा करतात. तसेच “जन्मोजन्मी हाच पती मिळावा’ अशी प्रार्थना करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महिला वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे, अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. त्यामुळे असे वृक्ष शाळेच्या आवरत जास्त लावणार असल्याचे या महिला शिक्षकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)