पुणे जिल्हा: कारमध्ये डॉक्‍टर आढळले मृतावस्थेत

गारगोटवाडी येथील घटना; खून की अपघाताचे तर्कवितर्क

राजगुरूनगर – गारगोटवाडी (ता. खेड) येथे कडूस रस्त्यावर एका कारमध्ये जनावरांचे डॉक्‍टर अनिल देवराम शिंदे (वय 45, सध्या रा. राजगुरुनगर. मूळ गाव जिल्हा नांदेड) हे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली असून त्यांचा खून झाला की अपघात याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पोलीस तपास सुरू केला आहे.

खेड पोलिस ठाण्यात पांडूरंग पोपट सांडभोर (वय 52, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडुरंग सांडभोर यांनी त्यांचे कामगार तुकाराम काळे यांना गुरूवारी (दि.24) फोन करून विचारले की, डॉ. अनिल शिंदे ऑफीसला आले नाहीत. ते कोठे आहेत याची माहिती घेऊन सांगा. फिर्यादीचे कामगारांनी त्यांना सांगितले की, डॉ. शिंदे धामणटेक येथील अनिल मोटे यांच्या पोल्ट्री कामावर आहेत. ते न आल्याने पांडुरंग सांडभोर हे तुकाराम काळे यांना बरोबर घेवून अनिल मोटे यांच्या पोल्ट्रीवर गेले असता त्यांनी सांगितले की, ते दोन तासांपूर्वी त्यांची कार घेवून गेले आहेत. डॉ. शिंदे यांचा फोन लागत नसल्याने ते दोघे जण कार घेवून त्यांचा शोध घेत असताना डॉ. अनिल शिंदे हे गारगोटवाडी कडूस रस्त्याकडेला कारमध्ये जखमी अवस्थेत आढळून आले, त्यांनी डॉक्‍टरांना उपचारासाठी चाकण येथे एक हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्‍टरांनी डॉ. शिंदे मयत झाले असल्याचे सांगितले. खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, डॉ. अनिल शिंदे यांचा अपघात नसून खून झाल्याची चर्चा आहे. नागरिकांमधील चर्चा आणि एका न्यूज पोर्टलला आलेल्या बातमीमुळे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी तपास सुरु केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)