पुणे जिल्हा: कारची ट्रकला धडक, एकाचा जागीच मृत्यू

आळेफाटा -कल्याण -अहमदनगर महामार्गावर बेल्हे गावाजवळ बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे स्विफ्ट कार व ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (दि. 22) रात्री 4.30 वाजता समर्थ कॉलेज समोर घडली, अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार गाडगे यांनी दिली. नांदेड येथे सोयरीकीचे काम उरकून (एमएच 12 जेयू 9007) या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने कल्याणच्या दिशेने घराकडे परत जात असताना बेल्हे गावाजवळ समर्थ कॉलेज समोर अहमदनगरच्या दिशेकडे तोंड असलेल्या (एमएच 05 डीके 5004) या ट्रकवर ही स्विफ्ट कार आदळली. या अपघातामध्ये कारमधील दिलीप किसन गाढवे (वय 45, रा. तुकाई भांबुरवाडी, ता. खेड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोरक्ष सबाजी गुंजाळ, बाळासाहेब मारूती दाते, रामदास दत्तात्रय ढोबळे, रत्ना बाळासाहेब दाते, मंगल दिलीप गाढवे हे जखमी झाले आहे. जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोरक्ष सबाजी गुंजाळ (वय 29, रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव) यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)