पुणे जिल्हा: काटीतील तिघांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा

रेडा – काटी (ता. इंदापूर) येथील टेलरला तिघांनी जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच तलावरीचा धाक दाखवित दुकानातील काउंटरमधून दोन हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी तिघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.

राजेंद्र तुकाराम मदने, ऋषिकेश राजू मदने, संग्राम उर्फ बबलू विलास मदने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी सोमनाथ भानुदास भोसले (वय 32)यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 25) रात्री आठच्या सुमारास सोमनाथ भोसले हे आपल्या टेलरींगच्या दुकानात काम करीत असताना, विठ्ठल-रूख्मणी मंदिरासमोरून मोटारसायकलवरून मेहुणा गणेश गोपाळ सांवत हा बसून येत असताना, मोटारसायकलचा हॉर्न का वाजविला म्हणून राजेंद्र मदने, ऋषिकेश मदने, संग्राम उर्फ बबलू विलास मदने यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत असताना,भांडणे सोडविताना भोसले यांनाही मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केली. तसेच आमच्या जीवावर जगतोस असे म्हणून, दुकान पेटवून देण्याची धमकी दिली व दुकानातील ड्रॉवरमधून दोन हजार रूपये घेऊन गेले, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन तिघांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)