पुणे जिल्हा: कडक उन्हामुळे डाळींब पिकाला फटका

शेतकरी वर्ग हैराण : आर्थिक तोटा होण्याची भीती

आणे -दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालल्याने जीवापाड जपलेले डाळिंबाचे पीक उन्हामुळे काळे पडू लागले आहे. डाळिंबाला उन्हापासून वाचवण्यासाठी बेल्हे येथील लक्षीमन गुंजाळ या शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात साडेचार हजार रुपये खर्च करून डाळिंबाला कापडी पिशव्या लावल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होउ लागले आहे.

आधीच पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी उन्हामुळेही अधिक संकटात सापडला आहे. कापडी पिशव्या आणून त्याला मजूर लावून शोधावे लागतात.उन्हामुळे मजुरही मिळत नाहीत. मजुरांना जास्त पैसे मोजावे लागतात. मजूरांकडून कापडी पिशव्या डाळिंबाला बसवाव्या लागतात. डाळिंबाला योग्य भाव मिळाला नाहीतर मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला सोसावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)