पुणे जिल्हा: कचरा समस्या नसून राष्ट्रीय संपत्ती

प्लॅस्टीकमुक्‍तीसाठी त्रिसूत्री वापरण्याची गरज
प्लॅस्टिकबंदीसाठी जनजागृती करणे, पर्यायी पिशव्या उपलब्ध करुन देणे व कायद्याची कडक अंमलबजावणी करणे या त्रिसूत्रीद्वरे प्लॅस्टिकवर निर्बंध येवू शकता. तसेच नागरिकांनी ठरविले तर घरच्या घरीही कचरानिर्मूलन होऊ शकते, गरज आहे ती सर्वांनी याबाबत गांभीर्याने काम करण्याची. कचरा समस्या ही भयानक असून भविष्यात कचऱ्यावरुन अराजकता निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रत्येक नगरपालिकेने या विषयावर धोरण ठरवून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्‍त केली.

बारामतीत कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोकरे यांचे प्रतिपादन

बारामती – कचरा ही समस्या नसून राष्ट्रीय संपत्ती आहे. कचऱ्यापासून राज्यात दररोज अडीच हजार मेट्रीक टन जैविक खत तयार होऊ शकते, याने रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेती सुपिक बनेल व परकीय चलनही वाचेल, असे प्रतिपादन कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिबिंब अंतर्गत कचरामुक्‍त शहराच्या दिशेने वाटचाल या विषयावर कोकरे बोलत होते. याप्रसंगी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड. ए. व्ही प्रभुणे व फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते.

रामदास कोकरे म्हणाले, उघड्यावर कचरा टाकू नका व कोणाला टाकू देऊ नका, कचऱ्याचे वर्गीकरण करा व प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर बंद करा, या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर कचरा समस्या चुटकीसरशी दूर होईल. स्वच्छतेच्या बाबतीत आजही आपण अशिक्षीत आहोत. घरापासून व घरातल्या प्रत्येकापासून कचरा वर्गीकरणास प्रारंभ झाला तर प्लॅस्टिकची समस्या पार दूर होईल. वेंगुर्ला नगरपालिकेत 27 प्रकारात कचरा वर्गीकरण करुन त्यापासून नगरपालिकेला उत्पन्न मिळवून दिले.

प्लॅस्टिक हॉटमिक्‍स डांबर प्लॅंटमध्ये मिसळून वेंगुर्ला येथे देशातील पहिला प्लॅस्टिक रस्ता बनविला व त्याचा दर्जा उत्तम आहे, रस्ते तयार करताना नगरपालिकेने टेंडरमध्ये प्लॅस्टिक रस्त्यांची अट आता घालायला हवी, असे कोकरे यांनी सांगितले. सामूहिक प्रयत्न झाले तर डंपिग ग्राऊंड मुक्त शहर सहज बनू शकते, असे त्यांनी नमूद केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)