पुणे जिल्हा: ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी

मंचर – पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय जगण्याचा आपण विचारच करु शकत नाही. मात्र, सद्यस्थितीत पाण्याची नासाडी केली जात आहे. उजवा आणि डावा कालव्याद्वारे आंबेगाव तालुक्‍यात पाण्याचे आवर्तन सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी वाटप केले असले तरी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. ओढे, नाले, रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व आणि फायदे पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणू जलाशय) येथून घोडनदीचे पात्र तसेच उजवा आणि डावा कालव्यास पाणी सोडले जाते. उजव्या कालव्याचे पाण्याने आंबेगाव-शिरूर तालुक्‍यातील 50 गावांतील शेती सुजलाम, सुफलाम झाली आहे. सद्यस्थितीत उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून अवसरी, गावडेवाडी, अवसरी खुर्द, मंचर परिसरात पाणी वाटप सुरू आहे. त्या अगोदर पोंदेवाडी,खडकवाडी, संविदणे, कवठे आदी गावांना पाणी वाटप करण्यात आले.

पाणीवाटप करताना शाश्‍वत शेतकऱ्यांना पाणी मिळेल. किंवा नाही याबाबत मात्र शेतकरी साशंक असतात. त्यामुळे रात्री अपरात्री चारीचे पाणी फोडून घेतले जात असल्याने पाणी वाटपाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांनी थेट कालव्यातील चारींना पाईप टाकून अनधिकृतपणे पाणी घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित चारीवरील प्रामाणिक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. अनेक शेतकरी रितसर पाणी पट्टया भरूनही त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी पट्टी उजव्या कालव्यावरील संशोधनाचा विषय बनला आहे. काही शेतकरी पाणीपट्टी न भरता पाणी घेण्यासाठी सर्वात पुढे आहे. परंतु प्रामाणिकपणे पाणीपट्‌टी भरणाऱ्यावर अन्याय होत आहे. याचे आत्मचिंतन जलसंपदा विभागाने केले पाहिजे. परंतु जलसंपदाचे अधिकारी, कर्मचारी पाणीपट्टी वसुलीबाबत उदासिन आहे. सद्यस्थितीत उजव्या कालव्याचे पाणी ओढ्यांना सुरू आहे. तसेच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर तसेच रस्त्याची खराबी होत आहे. तसेच पाणी वापरामुळे शेतीचे नुकसान होत आहे. अतिपाण्याचा वापर यामुळे पाण्याची नासाडी, शेतीची नासाडी होत आहे. याबाबत जलसंपदा विभागाने शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. डिंभा डावा कालव्याला अनेक ठिकाणी पाणी गळती आहे.त्यामुळे पाण्याची नासाडी होते. घोड नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यातून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात ऐन उन्हाळ्यात बंधारे पाण्याअभावी रिकामे दिसत आहे. याकडे जलसंपदा विभागाने लक्ष दिले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)