चाकण – एटीएम सेंटरमध्ये रक्कम भरणे व खातेदारांचे पैसे काढून जमा करणाऱ्या विश्रांतवाडी येथील रायटर सेफगार्ड प्रा. लि. या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी संगनमताने दोन लाख 27 हजार रुपयांची अफरातफर केली असून याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली.

ही घटना 18 एप्रिल 2018 रोजी रात्री 11. 58 वाजता ऍक्‍सिस बॅंकेच्या चाकण येथील एटीएम सेंटरवर घडली. याबाबतची फिर्याद अश्वाक इकबाल सय्यद (वय 42, रा. भैरवनगर, धानोरी रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कंपनीचा एटीएम ऑपरेटर सचिन आप्पाराव पायके व रवींद्र काशिनाथ काकडे (दोघेही रा. पुणे) या दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा रजिस्टर क्रमांक 466/2018, भादंवि कलम 408, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांनी रक्कम जमा असलेल्या एटीएम सेंटरमधून 46 लाख 44 हजार 550 रुपये काढले. त्यापैकी 44 लाख 17 हजार 550 रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या 2 लाख 27 हजार रकमेची अफरातफर केली. कंपनीच्या इंजिनिअर्सने या एटीएमची तपासणी केली असता घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)