पुणे जिल्हा: इंगवली, आळंदवाडीतील विकासकामांना सुरुवात

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची हजेरी

जोगवडी – भोर तालुक्‍यातील इंगवली आणि आंळदेवाडी जिल्हा परिषदेच्या निधीतून विविध विकासकामे सुरू झाली असून उद्‌घाटनाचा कार्यक्रम खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्ते हजर होते.

-Ads-

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंगवली आणि आंळदेवाडी गावात विविध विकासकामे झाली. इंगवली गावात रस्त्यासाठी 35 लाखाचा निधी, जि. प. शाळेच्या वॉलकपांऊडसाठी 8 लाख रुपये तर काळाने वस्तीस जोडणाऱ्या रस्त्यास 2.25 लाख रुपये असे एकून 45.25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आंळदेवाडी गावासाठी जोडरस्त्यासाठी 35 लाख रुपये, जिल्हा परिषद वर्गखोल्या बांधण्यासाठी 14.40 लाख रुपये आणि नळपाणीपुरवठा दुरुस्तीसाठी 15 लाख रुपये व बसथांबा बांधकामासाठी 3.50 लाख रुपये असा एकूण 67.90 लाख रुपयेयांचा निधी उपलब्ध झाला होता. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन बुधवारी (दि. 13) खासदार सुप्रियाताई सुळे याच्या हस्ते झाले. विक्रम खुटवड आणि सुप्रिया सुळे यांची भाषणे यावेळी झाली. सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची चांगली कामे केली असून, कार्यकर्त्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. भोर तालुक्‍याला बुथ कमिटीची गरज असून राजगड सागर कारखान्याची साखर कार्यकर्त्यानी तोंडात टाकावी, म्हणजे एकमेकांतील कटुता कमी होईल, असा टोलाही लागवला.

कार्यक्रमच्या प्रसंगी मउपसभापती लहूनानाशेलार, तालुका पंचायत समितीचे अध्यक्ष श्रीधर किंदे, चंद्रकांत बाठे, रणजीत शिवतरे, भालचंद्र जागताप, विक्रम खुटवड, तृप्ती खुटवड, पंचायत समितीच्या सभापती मंगल बोडके, इंगवलीच्या सरपंच नंदा पवार, उपसरपंच मनोज कोंडके, इंगवली गावातील आणि आंळदेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दिग्विजय बांदल आणि नरसिंग बांदल यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)