पुणे जिल्हा: आत्महत्याग्रस्त तरुणाची ओळख पटेना

वाकी -मार्बल दुकानाच्या शटरला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन 35 वर्षीय अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील उड्डाणपुलालगत असलेल्या नागेश्वर मार्बल व ग्रेनाईट येथे अकरा दिवसांपूर्वी घडला होता. मात्र, आठवड्याभराचा कालावधीत उलटून देखील आत्महत्याग्रस्त तरुणाची अद्याप ओळख पटली नसून, येथील पोलिसांना त्याचे नातेवाईक मिळून आलेले नाहीत. त्यामुळे चौकशीसाठी अडचणी येत असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. येथील पोलिसांनी मात्र याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे.

संजय अशोक सांबर (वय 45, रा. आयफेल सिटी, खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून, त्याची ओळखही अद्याप पटलेली नाही. त्याचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, नेसणीस ग्रे रंगाची फुल प्यांट, चेहरा उभट, डोक्‍याचे केस काळे, मिशी बारीक, पायात स्लीपर असे त्याचे वर्णन आहे. या वर्णनाच्या तरुणाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी ताबडतोब चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क (02135 – 249333) साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलीस हवालदार सुभाष पवार व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)