नारायणगाव -पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर नारायणगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

शब्बीर सुलेमान तांबोळी (रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबत गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथील पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 5 मे रोजी रात्री 8 वाजता शब्बीर सुलेमान तांबोळी याच्या किराणा दुकानामध्ये पोहे आणण्यासाठी गेली असता शब्बीर याने मुलीला जवळ बोलवून “तू माझ्यासोबत फिरायला येते का?’ असे म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. याबाबत मुलीने मंगळवारी (दि. 15) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यातील आरोपी शब्बीर सुलेमान तांबोळी हा फरार असून त्यास अटक करण्यासाठी पोलिसांची टिम तयार करून पाठविण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे व शंकर भवारी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)