पुणे जिल्हा: अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवणाऱ्यावर गुन्हा

वाघोली – अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिला सात महिन्यांची गर्भवती केल्याप्रकरणी बुर्केगाव येथील एकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज नामदेव थोरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनोज याने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मुलीच्या पोटामध्ये दुखत असल्याने मुलीच्या आईने तिला दवाखान्यात दाखल केले असता, मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न आले. याप्रकरणी मनोज थोरात याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)