पुणे : जलतरण तलाव प्रकरणावर ‘वादाचे तरंग’!

पुन्हा होणार तपासणी


क्रीडा समितीने घेतले प्रशासनाला फैलावर

पुणे- महापालिकेच्या 31 जलतरण तलावांमधील अवघे 4 जलतरण तलाव पोहण्यासाठी सुरक्षित आहेत, हा धक्कादायक अहवाल क्रीडा विभागने स्थायी समितीसमोर नुकताच सादर केला. मात्र, तलाव तपासणीसाठी नेमलेल्या समितीऐवजी क्रीडा विभागाने परस्पर हा अहवाल केल्याची बाब समोर आल्यानंतर क्रीडा समितीने प्रशासनास चांगलेच फैलावर घेतले आहे. आता या तलावांची पुन्हा तपासणी होणार आहे.

प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराबाबत समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाला याबाबत जाबही विचारण्यात आला आहे. तर या सर्व तलावांची पुन्हा तपासणी करून तातडीने त्याचा अहवाल क्रीडा समितीमध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– राहूल भंडारे,अध्यक्ष, क्रीडा समिती

पाण्याचा अंदाज न आल्याने 21 वर्षीय तरुणाला तळजाई टेकडी येथील जलतरण तलावात प्राण गमवावे लागले. त्यानंतर सर्व तलावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. त्यानुसार, क्रीडा विभागाने 21 ते 23 एप्रिलदरम्यान ही तपासणी केली. पालिकेच्या मालकीचे 31 जलतरण तलाव असून त्यात 10 बंद आहेत. तर उर्वरीत 21 तलावांमध्ये 4 पोहण्यासाठी सुरक्षित असून 9 सरासरी सुरक्षित असल्याचा अहवाल सादर केला होता. आता या तलावांची पुनर्तपासणी करणार असल्याची माहिती क्रीडा विभागप्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली.

-Ads-

काय झाला होता समितीचा गोंधळ?
महापालिकाअतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी 20 एप्रिल रोजी या तपासणी पथकाच्या नेमणुकीचे आदेश काढले. त्यानंतर या समितीमधील बहुतांश सदस्यांना ही माहिती देण्याआधीच क्रीडा विभागाने परस्परच जलतरण तलावांची तपासणी केली. त्याचा अहवाल सादर करताना मात्र, या समिती सदस्यांची नावे सादर करण्यात आली आहेत. तसेच या अहवालावर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही. या समितीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संजीव वावरे यांचेही नाव आहे.

मात्र, डॉ. वावरे यांनी “आपण या तपासणी समितीमध्ये नव्हतोच’, असे सांगत हात वर केले. तर, क्रीडाधिकारी किशोरी शिंदे यांनी “या तपासणीसाठी कमी वेळ असल्याने काही समिती सदस्यांची वाट न पाहता क्रीडा विभागानेच ही तपासणी केली’ असे सांगितले. गुरूवारी क्रीडा या गोंधळावरून सर्वच समिती सदस्यांनी प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर गुरूवारी टीका केली. तसेच एवढ्या महत्वाच्या विषयाबाबत चुकीच्या पध्दतीने काम केल्याबाबतही नाराजी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)