पुणे – जप्तीच्या 203 वाहनांचा लिलाव

-आरटीओच्या तिजोरीत 29 लाख 50 हजारांचा महसूल

पुणे – थकीत करासाठी अटकावून ठेवलेली, बिनधनी तसेच नोंदणी रद्द केलेली व रस्त्यावर वापरात येणारी वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करुन अटकावून ठेवली होती.

सदर जप्त केलेल्या वाहनांचा बुधवारी (दि.30) आरटीओ कार्यालयात लिलाव करण्यात आला. यातून सरकारी तिजोरीत सुमारे 29 लाख 50 हजारांचा महसूल जमा झाला आहे.

लिलाव केलेली वाहने आरटीओ कार्यालय (संगम ब्रिज), पीएमपीएमएल डेपो, एसटी डेपो व पोलीस स्टेशन आदी ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या. बुधवारी एकूण 203 वाहनांचा लिलाव करण्यात आला. यामध्ये 81 तीन आसनी रिक्षा, 80 सहा आसनी रिक्षा, 12 खाजगी व्हॅन, 8 बसेस, 3 ट्रक, 6 डिलिव्हरी व्हॅन व 13 टूरिस्ट टॅक्‍सी अशा प्रकारच्या वाहनांचा समावेश होता. लिलाव खरेदी प्रक्रियेमध्ये 350 लोकांनी सहभाग घेतला. सदर लिलावाची प्रक्रिया उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे व वरिष्ठ लिपिक विवेक शेळके, चेतन माने यांनी पार पाडली.
——————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)