पुणे :जनता सहकारी बॅंक पुणेच्या मार्केटयार्ड शाखेच्या नूतनीकृत वास्तूचे उद्‌घाटन आणि शाखेचा वर्धापन दिन आज सोमवार दि. 21 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी नूतनीकृत शाखेचे उद्‌घाटन केले. या प्रसंगी डावीकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, शाखा व्यवस्थापक सत्यनारायण कंदुल, संचालक बिरू खोमणे आणि उपाध्यक्ष जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्धापनदिन उत्साहात साजरा 
पुणे – बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक बॅंकिंग सेवा सुविधा देण्यात आघाडीवर असणाऱ्या जनता सहकारी बॅंक पुणेच्या मार्केटयार्ड शाखेच्या नूतनीकृत वास्तूचे उद्‌घाटन आणि शाखेचा वर्धापन दिन काल सोमवार दि. 21 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, शाखा व्यवस्थापक सत्यनारायण कंदुल, संचालक मंडळ सदस्य, सभासद, खातेदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी आज येथे दिली.

मार्केटयार्ड शाखेच्या माध्यमातून जनता बॅंकेच्या विविध सेवा सुविधा या भागातील नागरिकांना गेली अनेक वर्षे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नूतनीकृत शाखेच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला अत्याधुनिक बॅंकिंग सेवा सुविधा उपलब्ध होणार असून त्यामध्ये इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग, एनिवेअर बॅंकिंग, NEFT/RTGS विमा इत्यादी बॅंकिंग सेवा – सुविधांचा समावेश आहे असे लेले यांनी यावेळी सांगितले. जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र व गुजरात राज्यांत 71 शाखा कार्यरत असून बॅंकेचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्‍स) 14 हजार कोटींपेक्षा अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)