पुणे : जनजागृती आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पाऊल

पुणे : रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करून रस्त्यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पार्किंग पॉलिसी तयार करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर, बंगळूर, दिल्लीसोबतच रांची सारख्या शहरातही यापूर्वीच पार्किंग पॉलिसी राबविण्यात येत आहे. परंतू आपण या शहरांप्रमाणे भौगोलिक विभागणीवर दर अवलंबून न ठेवता ते पार्किंगच्या मागणीवर आधारीत ठेवल्याने सोयीचे ठरणार आहेत, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

पुणे महापालिकेने गेल्या काही वर्षात वाहतूक संबधी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प शहरात राबविले आहेत. परंतू जोपर्यंत रस्त्यांचे व्यवस्थापन योग्यरितीने होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पांचे योग्य परिणाम दिसून येणार नाहीत. शहरातील जवळपास प्रत्येकच रस्त्यावर पार्किंग केले जाते. शहरातील 1800 कि.मी. रस्त्यांचे व्यवस्थापन करणे तसे अडचणीचे आहे. परंतू पार्किंग पॉलिसीच्या निमित्ताने या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण, दिवस आणि रात्रीच्या वेळेतील तेथील पार्किंगची गरज याचा अभ्यास करूनच अ, ब, क असे तीन झोन करून दर आकारणी करण्यात येणार आहे.

ज्या रस्त्यांवर पार्किंगची अधिक मागणी आहे, त्याठिकाणी अधिकचे दर असतील. जेणेकरून एकाच ठिकाणी दिवसभर उभ्या राहाणाऱ्या वाहनांचे प्रस्थ कमी होईल, किंबहुना दिवसभर वाहन विनावापर सार्वजनिक ठिकाणी उभे करायचे झाल्यास पैसे भरावे लागतील, याबाबत जनजागृती होईल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असे कुणाल कुमार यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)