पुणे –  चोरट्याने महिलेच्या कानातील झुमका लांबविला

पुणे – पान टपरीमध्ये जेवण करत असताना अनोळखी व्यक्‍तीने जवळ येत हिसका मारून कानातील झुमका चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मानक मार्केट, पुणे-सातारा रोड याठिकाणी असलेल्या सचिन पान टपरीवर घडली. याप्रकरणी चोरट्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिना सुरेश बीरे (52, रा. बालाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शुक्रवारी दुपारच्या सुमारास टपरीमध्ये जेवन करत बसल्या होत्या. यावेळी एका इसमाने अचानक जवळ येत त्यांच्या कानातील झुमका हिसका मारून पळून गेला. यामध्ये त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून 10 हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा अधीक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)