पुणे – चिंचेची आवक सुरू, भाव तेजीत

उत्पादन कमी असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज


कर्नाटक, तामिळनाडू, आंधातून वाढणार मागणी

पुणे – गोड-आंबट चवीची चिंच म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा चिंचेचा हंगाम सुरू झाला आहे. मागील आठवड्यापासून मार्केटयार्डातील तरकारी विभागात चिंचेची तुरळक आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेचे उत्पादन कमी असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवित आहेत. हंगामाची नुकतीच सुरुवात झाल्यामुळे चिंचेचे भाव तेजीत आहेत. पुढील काळात आवक वाढल्यास चिंचेचे भाव आवाक्‍यात येतील, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.

बाजारात एकदिवसाआड 4 ते 6 पोती चिंचेची आवक होत आहे. बाजारात टरफल काढलेल्या चिंचेस दहा किलोला 420 ते 450 रुपये तर, टरफलासहित चिंचेस 10 किलोस 280 ते 320 रुपये भाव मिळत आहे. गेल्यावर्षी टरफल काढलेल्या चिंचेस 10 किलोला 280 ते 320 रुपये, तर टरफलासहित चिंचेस 10 किलोस 220 ते 250 रुपये भाव मिळाला होता. “चिंचेचा हंगाम एप्रिल ते मेपर्यंत सुरू राहील. हंगामाची सुरुवात असल्याने आवकेचे प्रमाण कमी आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढेल,’ अशी माहिती चिंचेचे व्यापारी अजित घुले यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या बारामतीसह जिल्ह्याच्या इतर भागांतून चिंचेची तुरळक आवक होत आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत पश्‍चिम महाराष्ट्रातून सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, सोलापूर या भागासह जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातून आवक सुरू होईल. राज्यात चिंचेचे उत्पादन कमी होणार असले, तरीही पुणे जिल्ह्यात मात्र चांगले उत्पादन असणार आहे. सूपा मार्केटमधून परराज्यातील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात चिंचेला चांगली मागणी राहते. बाजारात दाखल होणाऱ्या चिंचेला शहर आणि जिल्ह्यातून चांगली मागणी आहे. पुढील काही दिवसांत कोकणातून चिपळूण, महाड आदी भागातून मागणी वाढेल. परराज्यातून मागणी वाढल्यास चिंचेचे भाव चांगले राहतील. त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असा अंदाजही घुले यांनी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)