पुणे : चारित्र्याच्या संशयावरून टेकडीवर महिलेचा खून

पुणे – पतीने पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह हनुमान टेकडीवर टाकून दिल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दारुच्या नशेत त्याने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. कोमल देवराम देवकर (32, रा. कुसाळकर बिल्डींगसमोर, जुनी वडारवाडी), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर देवराम शेट्टी देवकर असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याला डेक्‍कन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोमल आणि देवराम हे जुन्या वडारवाडीमध्ये राहायला होते. देवराम याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त होत आहे. टेकडीवर खून झाल्याची माहिती डेक्‍कन पोलिसांना सायंकाळी पाचच्या सुमारास समजली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरात केलेल्या चौकशीमध्ये हा मृतदेह कोमल देवकर या महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. हा खून तिच्या पतीने केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन काही तासात ताब्यात घेतले. त्याने चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. पुढील तपास डेक्‍कन पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)