पुणे : चायनीज दुकानात बोलावून तरुणास मारहाण

पुणे- भेटण्यासाठी म्हणून ओळखीच्या महिलेने एकाला चायनीज दुकानात बोलावले. दुकानात आल्यानंतर आपापसात संगनमत दुकानातील कामगारांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यातील एकाने तरुणाच्या हातावर कोयत्याने वार केला. या प्रकरणी महिलेसह दुकानात काम करणाऱ्या इतर व्यक्तींविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशिष शिंदे (18, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी), 38 वर्षीय दुकानदार महिला तसेच दुकानात काम करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी व आरोपी महिला हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 21 एप्रिल रोजी आरोपी महिलेने फिर्यादीला वडारवस्ती, विश्रांतवाडी येथील चायनीज दुकानात भेटण्यसाठी बोलावले.

फिर्यादी दुकानात आल्यानंतर आरोपी शिंदे याने फिर्यादीच्या हातावर कोयत्याने वार केले. यानंतर दुकानात काम करणाऱ्या इतर लोकांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)