पुणे: घर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

पूर्वीच्या भांडणातून झालेल प्रकार, ऍट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल

पुणे – जुन्या भांडणातून घर पेटवून देऊन तसेच तीन दुचाकी गाड्या आणि सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नुकसान केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अटक आरोपींवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळकृष्ण ऊर्फ दादा अंकुश कुडले (वय 20), ओंकार रघुनाथ साळवी ( 20, रा. कोकरेचाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 436, 427, 34 अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 चे कलम 7 (1) (ख) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 मे रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी शारदा वसंत कसबे ( 55 रा. शास्त्रीनगर, कोथरूड ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दादा कुडले आणि त्याचा एक मित्र यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीच्या घराला आग लावून घराबाहेर पार्क केलेल्या फिर्यादीच्या मुलाची बुलेट, दोन ऍक्‍टीवा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोडून नुकसान केले. तसेच रस्त्यावर असलेली दुसरी ऍक्‍टीवा तोडून नुकसान केले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी या अनुसुचीत जाती जमातीच्या असल्याचे आरोपींना माहित असतानादेखील यापूर्वी केलेल्या केसचा राग मनात धरुन आरोपींनी घराला आग लावल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)